fbpx

मी गृहमंत्री असताना मला देखील धमक्या आल्या, पण मी भांडवल केल नाही – जयंत पाटील

Jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : एखादं धमकीच पत्र आल तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी वर्तमानपत्रात छापून आणण्याची गरज काय ? आपल्याला आलेल्या धमकीचा राजकीय फायदा घेण्याच काम याआधी कधीच झालेलं नाही ते आता होत आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर केली आहे. तर मी गृहमंत्री असतांना मला देखील धमक्या आल्या होत्या पण त्याच मी कधी भांडवल केल नाही अस देखील जयंत पाटील म्हणाले आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका निनावी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती. मागच्या महिन्यात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती तसेच आता पुण्यातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निनावी पत्र आले होती.

माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीचं असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवण्यात आल होत. या पत्रात आमचा मार्क्सवादाचा विचार तुम्ही संपवू शकणार नाही असे म्हटले होत. दरम्यान हे पत्र मिळाल्यानंतर गृहविभागाने मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.

पहा संपूर्ण मुलाखत