जेव्हां ‘एकनाथ खडसे’ आणि ‘अशोक चव्हाण’ एकत्र येतात

eknath khadse,ashok chavan

रावेर: रावेरमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते राजू रघुनाथ पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजू रघुनाथ पाटील जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे एका व्यासपीठ उपस्थित होते. त्यामुळे व्यासपीठावर चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती. दरम्यान अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेस मध्ये येण्याची ऑफर दिली. या कार्यक्रमातील भाषणादरम्यान एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला.

‘रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो की तरह. बैठे है उन्हीके कूंचे मे हम आज गुनहरगारों की तरह’, हे गाणे गात खडसेंनी आपली व्यथा मांडल्यावर तिथे उपस्थित असलेले अशोक चव्हाणांनाही खडसेंना पक्षात येण्याची ऑफरच दिली. ‘नाथाभाऊ, तुमच्या मदतीसाठी आमची दारं सदैव उघडी आहेत. सत्ता गेली तरी बेहत्तर पण स्वाभिमान सोडणार नाही ही खडसेंची भूमिका स्वागतार्हच आहे. खडसेच खरे स्वाभिमानी असून स्वाभिमानी नावाने पक्ष काढणाऱ्यांची अवस्था आपण बघतच आहोत, असे सांगत चव्हाणांनी नारायण राणेंवरही निशाणा साधला. एकनाथ खडसे हे सध्या पक्षावर नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.Loading…
Loading...