Share

Atul Bhatkhalkar | “कोरोना काळात जनाब मुख्यमंत्री घरी बसले होते तेव्हा…”; अतुल भातखळकर यांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सोमवारी लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होण्याची घोषणा केली. या प्रकल्पाची  निविदा प्रक्रिया झाली असून कामाला नोव्हेंबर पासून सुरुवात होण्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र शिवसेनेकडून वारंवार महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेत असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात भाजपने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

गेले तीन ते चार महिने झालं राज्याच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मात्र हे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यानंतर एक मोठा वाद राजकीय वर्तुळात सुरु झाला.

महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय गदारोळ सुरू झाला. या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर अनेक आरोप केले. याचं प्रत्युत्तर देत अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी “कोरोना काळात जेव्हा जनाब  मुख्यमंत्री घरी बसलेले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते याची झलक पहा” असं म्हणत एक फोटो ट्विट केला आहे. “महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प इतर ठिकाणी गेले अशी बोंब मारणाऱ्या आणि कोरोना काळात घरी बसून राहणाऱ्या यांच्यासाठी…” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना चिमटा काढला आहे. महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकामटेकड्या घरबश्यांसाठी  महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हा रेल्वे कारखाना म्हणजे पोटात मुरडा आणणारी बाब असल्याचं देखील अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सोमवारी लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होण्याची …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now