राणाघाट:- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापवले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा जेव्हा पराभव होईल तेव्हा ट्रम्प समर्थकांप्रमाणेच ते गोंधळ घालतील, असे ममतांनी भाकित केले आहे.
बहुतांश नेते केंद्रीय यंत्रणांच्या तपासाच्या भितीपोटी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अनेकांना भाजप धमकावून पक्षात ओढून घेत आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये किंमत राहिली नसून अन्य पक्षांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट लोकांना सामील करुन घेतले जात आहे. भाजपचा पक्ष म्हणजे कचराकुंडी झाली असून या ठिकाणी निष्क्रिय, भ्रष्ट नेत्यांना सामील करुन घेत आहेत, असे ममता यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा ‘या’ हॉस्पिटल्समध्ये होणार श्रीगणेशा
- काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पवारांसोबत खलबतं; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली वाढल्या !
- कंगना रनौत उतरणार राजकारणाच्या मैदानात?; ट्विटरवरून दिले संकेत
- दुखापतीमुळे आणखी एक खेळाडू संघाबाहेर; रहाणेची वाढली चिंता
- कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन