धडक दिल्याचा जाब विचारताच सहा जणांनी तरुणाला लुटले

औरंगाबाद :  दुचाकीला धडक दिल्याचा जाब विचारताच सहा जणांनी तरुणाला लुटल्याची घटना २८ जुलै रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मुकुंदवाडीतील झेंडा चौकात घडली. मनमितसिंग किशनसिंग लोहीया (२७) असे तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लोहिया हे दुचाकीने झेंडा चौकातून घरी जात असताना आकाश पिंपळे याने दुचाकीला धडक दिली. त्याचा जाब विचारताच पिंपळे याने साथीदार अनिकेत हिवाळे व अन्य चौघांना बोलावून मनमितसिंगला शिवीगाळ आणि मारहाण केली.

दरम्यान मारहाण करत असतांना त्यांनी लोहिया यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी आणि पन्नास हजाराची रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या