बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती

महामुलाखती नंतर उद्धव ठाकरेंचा  शरद पवारांना थेट प्रश्न

मुंबई : पुण्यात बीएमसीसी महाविद्याच्या मैदानावर काल २१ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि माझे चांगले सबंध होते. तसेच आमचा घरोबा होता असे मत व्यक्त केले. दरम्यान २००० साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

महामुलाखती नंतर उद्धव ठाकरेंनी  शरद पवारांना थेट प्रश्न विचरला आहे. शरद पवारांनी मांडलेले विचार बाळासाहेबांनी ५० वर्षापूर्वीच मांडले होते. पवारांना शिवसेना समजायला ५० वर्ष लागली असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ठाकरे म्हणाले, २००० साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, त्याचप्रमाणे बाळासाहेबांना अटकावण्याचा प्रयत्न केला होता. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला.

You might also like
Comments
Loading...