‘लाच’ स्वीकारतांना ग्रामसेविकेला रंगेहात पकडले

mother,son,attack,sangali

जालना/ प्रतिनिधी: जालना तालुक्यातील रोषणगाव हिवरा येथील ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ग्रामसेविका सरिता तायडे यांनी नमुना आठच्या उताऱ्यावरील कर्जबोजा नोंदवण्यासाठी तक्रारदारास पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने दोन हजार रूपये रक्कम आधीच दिली होती. उरलेले तीन हजार रूपये स्वीकारताना रेल्वे स्टेशन परिसरात त्यांना आज रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे नमुना नंबर आठ वर कर्ज बोजा नोंदवू नये असे राज्य शासनाने स्पष्टपणे बजावले आहे.