पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरचं मिळणार गहू आणि तांदूळ; सरकारचा अजब निर्णय

टीम महाराष्ट्र देशा :पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

अशातच राज्य सरकारने पुरात अडकलेल्या लोकांसाठी अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरच गहू आणि तांदूळ मिळणार असल्याचा अजब निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

तसेच पूरपरिस्थितीवरून राज्य सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘कर्नाटकच्या यदियुरप्पांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे आमदार मुंबईत ठेवता येतात. पण त्यांचं सरकार आल्यावर यांना पान्हा फुटत नाही. म्हणतात आम्ही धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी यदियुरप्पांना सांगतो. आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर?’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला आहे.

दरम्यान, या पूर परिस्थितीविषयी विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे पूर परिस्थितीवरून विरोधकांनी आता सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

महापूर सेल्फीनंतर महाजनांनी पाण्यात उतरून घेतला आढावा

 

बहिणींना माहेरच्या आधाराची गरज, चला सगळे मिळून संसार उभा करूया : जितेंद्र आव्हाड