नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर व्हाट्सअपचे स्पष्टीकरण…

व्हॉट्सऍप

नवी दिल्ली: व्हॉट्सऍपच्या नवीन पॉलिसी वरून जगभरातून टीका होत आहे. ग्राहकांच्या माहितीचा वापर करण्याची परवानगी द्या नाही तर सेवा बंद करणे ही एक जबरदस्ती असल्याचं बोललं जात आहे. यावर आता व्हॉट्सऍपने स्पष्टीकरण दिले आहे.

या नव्या पॉलिसीमध्ये बिजनेस व्हाट्सअप मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ते देखील पर्यायी आहेत. त्याच बरोबर तुम्हाला तुम्ही माहिती कुठून मिळवता आणि वापरता. व्हाट्सअप आज देखील तुमचे मेसेज पाठवू शकत नाही आणि कॉल ऐकु शकत नाही. वॉट्सऐप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे आणि कायम राहणार आहे. व्हॉट्सऍपने   ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

व्हाट्सअप कडून सांगण्यात आले आहे की, कंपनीने आणलेल्या या नवीन पॉलिसी अंतर्गत व्हाट्सअप ग्राहकांच्या संवेदनशील माहिती फेसबुक सोबत शेअर करणार नाही. मित्र आणि परिवारासोबत देखील तुमच्या मेसेजेस ची गुप्तता भंग केली जाणार नाही.

महत्वाच्या बातम्या