WhatsApp- चॅटींगसाठी व्होडाफोन व व्हाटसअ‍ॅप एकत्र

मराठीसह अन्य भारतीय भाषांमधील चॅटींगसाठी व्होडाफोनने व्हाटसअ‍ॅपशी सहकार्याचा करार केला. त्यांच्या मदतीने या मॅसेंजरवरील प्रादेशीक भाषांच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळणार आहे. भारतीय भाषांच्या वापराला प्राधान्य देण्यासाठी व्हाटसअ‍ॅपसोबत सहकार्याचा करार केला आहे. यानुसार आता व्होडाफोनचे युजर्स व्हाटसअ‍ॅपचा उपयोग आपापल्या भाषांमध्ये अधिक सहजपणे करू शकतील. युनिकोडच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपवर भारतीय भाषांचा वापर आधीपासूनच सहजपणे करता येत आहे. मात्र व्होडाफोनने विविध भारतीय भाषांसाठी कस्टमाईज्ड पेजेस तयार केले आहेत त्याच्या मदतीने व्हाटसअ‍ॅपवर सुलभ पध्दतीने स्थानिक भाषांचा वापर करता येणार आहे.जगभरात १.२ अब्जांपेक्षा जास्त युजर्स असणार्‍या व्हाटसअ‍ॅपला अंदाजे २० कोटी भारतीय वापरत आहेत. याच्या माध्यमातून संदेशांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत आहे.

You might also like
Comments
Loading...