Share

Whatapp Update | Whatapp घेऊन येत आहे ‘हे’ नवीन इंटरेस्टिंग फीचर

टीम महाराष्ट्र देशा: सर्वात लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअप (Whatapp) नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर वर काम करत असते. जेणेकरून व्हाट्सअपची लोकप्रिय अधिकाधिक वाढत जाते. असेच एक नवीन फीचर व्हाट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी घेऊन येत आहे. हे फीचर पेंडिंग ग्रुप पर्टिसिपेंटसाठी आहेत.

व्हाट्सअप वर कुठलाही ग्रुप बनवला तर त्यामध्ये पार्टिसिपेंट्स ॲड करायच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्हाट्सअप आता खास व्हाट्सअप ग्रुपसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिनला पार्टिसिपमेंट ग्रुप मध्ये ॲड होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात. त्याचबरोबर कुणाची पेंडींग रिक्वेस्ट स्वीकारायची हा संपूर्ण निर्णय ग्रुप ॲडमिन घेऊ शकेल.

Whatapp न्यू फीचर

WABetainfo या वेबसाईटच्या नवीन रिपोर्टच्या अहवालानुसार, व्हाट्सअप लवकरच आपले नवीन फीचर घेऊन येणार आहे. व्हाट्सअपच्या येणाऱ्या आगामी अपडेट मध्ये हे फीचर उपलब्ध असेल. या फीचरच्या मदतीने व्हाट्सअप वापरकर्त्यांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवता येईल. त्याचबरोबर व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन लोकांच्या या रिक्वेस्टला एक्सेप्ट करू शकेल. या फीचरच्या मदतीने आता व्हाट्सअप ग्रुप मध्ये लोकांना सामील करणे सोपे होणार आहे.

व्हाट्सअप न्यू अपडेट

व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. आता येणाऱ्या नवीन फीचर बद्दल जर सांगायचे झाले तर, या नवीन फीचरद्वारे ग्रुप ॲडमिन आता एका क्लिकवर पार्टिसिपेटच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करून त्यांना ग्रुप मध्ये ॲड करू शकतो. या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिन कुणाला ग्रुप मध्ये ॲड करण्यासाठी कुणाची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची हे ठरवू शकतो.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सर्वात लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअप (Whatapp) नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर वर काम करत असते. …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now