व्हॉट्स अॅ्पच जुनं ‘स्टेटस’ फीचर पुन्हा येणार

blank
व्हॉट्सअॅ्पने आपल्या 8व्या वाढदिवसानिमित्त ‘स्टेटस’ फीचर लाँच केले होते. पण अनेक यूजर्सना हे फीचर आवडलेले नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप आपले जुने फिचर पुन्हा आणू शकते. जिथं यूजर्स पूर्वीप्रमाणे आपले टेक्स फीचर ठेऊ शकते.
जुने फीचर हे Tagline नावानं पुन्हा आणू शकतं. व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल WABetaInfo ही माहिती शेअर केली आहे.
सध्या नव्या ‘स्टेटस’ फीचरमध्ये यूजर्स व्हिडिओ, फोटो आणि जीआयएफ अपलोड करु शकतात. जे पुढील 24 तासापर्यंत तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्यांना दिसू शकते.

 

व्हॉटस्अ‍‍ॅपचं नवीन फिचर ‘स्टोरीज’

यासोबतचं तुम्ही तिथं टेक्स्ट स्वरुपात स्टेटसही ठेऊ शकतात. पण यामुळे जुने टेक्स्ट स्टेटस गेले आहे. त्यामुळे 24 तासानंतर तुम्हाला फोटो आणि स्टेटस बदलणे गरजेचे आहे.