WhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर ‘पिक्चर इन पिक्चर’ हे नवीन फिचर

व्हाटसअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉलिंगमध्ये लवकरच ‘पिक्चर इन पिक्चर’ हे फिचर देण्यात येणार असून अँड्रॉइडच्या ओ आवृत्तीत ही सुविधा मिळेल.
व्हाटसअ‍ॅप लवकरच पिक्चर इन पिक्चर हे महत्वाचे फिचर येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅपची २.१७.२६५ ही बीटा आवृत्ती नुकतीच जारी करण्यात आली आहे. याची खासियत म्हणजे यात पिक्चर इन पिक्चरची सुविधा असेल. यामुळे व्हिडीओ कॉलींग करतांना अजून एक विंडो दिसेल. यात संबंधीत युजर दुसर्‍या युजरसोबत चर्चा करू शकेल. ही विंडो नेमकी फ्लोटींग या प्रकारातील असेल की फिक्स ? तसेच पर्सनल चॅट अथवा ग्रुपमधील दोन व्हिडीओ एकचदा पाहतांनाही या पध्दतीने ‘पिक्चर इन पिक्चर’ची सुविधा मिळणार का? याबाबत माहिती समोर आलेली नाही. तथापि, व्हाटसअ‍ॅपच्या सर्व युजर्सला याची सुविधा लवकरच मिळणार असल्याची बाब स्पष्ट आहे.