सोशल मीडियावर दिले त्यांनी लग्नाचे निमंत्रण…

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि विद्यमान नगरसेवक गिरीजाराम हाळनोर यांनी मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी चक्क सोशल मिडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. ना पत्रिका छापण्याचा खर्च ना त्या पोहचवण्यासाठीचा खटाटोप. पण हा निर्णय त्यांनी एकट्यानेच नाही तर नवऱ्या मुलाकडील लोकांना विश्वासात घेऊन घेतला आहे.
आजकाल नेत्यांच्या मग तो अगदी सामान्य कार्यकर्ता असो, त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांच्या लग्नाचा तोरा काही औरच असतो. त्यात जर नेते प्रदेशाध्यक्ष आणि मुलगा आमदार असेल आणि होणाऱ्या सुनेचे वडिल आणि काका सिनेसृष्टीशी संबंधीत असतील तर बोलायलाच नको.
मग खर्चाचा हिशोबही मांडायचा नसतो. वारेमाप खर्च झाला तरी चालेल. अशीच काहीशी उदाहरणे अलीकडच्या काळात पहायला मिळाली. अगदी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी त्याच्या मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने केले. पण रिसेप्शनची चर्चा रंगली. पण गिरीजाराम हळनोर यांनी त्या सगळ्या गोष्टींना फाटा देत. निमंत्रण सोशल मिडियावरून दिले. त्याच बरोबर ज्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांना प्रत्यक्ष  फोन बोलून लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले. वारेमाप खर्चाला फाटा देत हळनोरआण्णांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे.