व्हॉट्सअप अॅडमिनच्या अधिकारात वाढ

व्हॉट्सॲप

टीम महाराष्ट्र देशा : संभाषणाच सर्वात सोपं साधन बनलेल्या व्हॉट्सअपने नवनवीन फीचर्स आणायला सुरवात केली आहे.
व्हॉट्सअपने आणखी एक नवं फीचर सुरु केलं असून यामुळे अॅडमिनला सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत. ग्रुपमध्ये कोणी पोस्ट टाकायच्या याचा निर्णय आता अॅडमिन घेऊ शकतो. ग्रुपमध्ये अनेकांना समाविष्ट केलं असलं तरी काही सदस्य बास्कळ पोस्ट टाकत असतात. अनेकदा काही मंडळी विखारी आणि तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट वारंवार टाकत असतात. अशा पोस्टमुळे अॅडमिन धोक्यात येऊ शकतो. त्यामुळेच व्हॉट्सअपने हे नवं फिचर सुरु केल आहे. या फीचर्समुळे अॅडमिनला दोन पर्याय मिळतात. पहिला असतो तो म्हणजे ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने पोस्ट टाकण्याची मुभा असलेला पर्याय आणि दुसरा म्हणजे फक्त अॅडमिननेच पोस्ट टाकण्याचा निर्णय

हे फिचर कसं वापरायचं?  

• तुम्हाला ज्या ग्रुपसाठी निर्णय घ्यायचा आहे, तो ग्रुप निवडा
• ग्रुपच जिथे नाव असतं त्याच्या बाजूला तीन टिंब असतात त्यावर क्लिक करा
• यातील सगळ्यात पहिला म्हणजे ‘ group info’ हा पर्याय निवडा
• हा पर्याय निवडताच तुम्हाला पाच पर्याय आलेले दिसतील
• यातील तुम्हाला ‘Group Setting’ हा पर्याय निवडायचा आहे
• त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला पर्याय दिसेल तो असेल ‘Edit group info’
• यामध्ये आता तुम्हाला All participant किवा Only admin यापैकी हवा तो पर्याय निवडायचा आहे.
जर अॅडमिनने नवं फिचरवापरूनइतर सदस्यांना पोस्ट करण्यास बंदी घातली असेल आणि एखाद्याने पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याबाबतचा मेसेज अॅडमिनला मिळतो. ती पोस्ट स्वीकारून पोस्ट करण्याला परवानगी द्याची कि नाही हे अॅडमिन ठरवतो, त्याचा होकार आला तरच ती पोस्ट ग्रुपमध्ये पडते.या फिचरचा वापर अफवा पसरवणारे संदेश, समाजात वितुष्ट निर्माण करणारे संदेश, विचलित करणारी दृश्य फोटो रोखण्यासाठी केला जाऊ शकतो.

‘गुगल फॉर जॉब्स’ नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुगलची सेवा