आता ‘या’ कारणामुळे व्हॉट्सअ‍ॅप झाले अधिकच सुरक्षित

whtsapp

नवी दिल्ली: व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या मेसेजिंग अ‍ॅप केवळ तरुण वर्गालाच नाही तर सर्वांनाच हे अप सोईचे आहे. मात्र याचा जेवढा वापर अधिक तेवढा धोका देखील असतो. याचदरम्यान व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेजेस इनक्रिप्टेड असल्याने ते कोणीही वाचू शकत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केवळ एंड-टू-एंड जरचं पाहू शकतो. अनेकदा आपल्यला व्हॉट्सअ‍ॅप चालू केल्यानंतर एंड-टू-एंड असे लिहिलेले पाहायला मिळते. पण नेमके हे काय आहे हे माहित नसल्याने आज आपण ते जाणून घेऊयात.

व्हॉट्सअॅपमध्ये सुरुवातीपासून हे अॅप नव्हतं, परंतु मेसेजच्या सुरक्षिततेच्या मागणीदरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने हे लाँच केलं. एंड -टू-एंड (End-to-end encryption)टेक्नोलॉजी मेसेज सुरक्षितरित्या सेंड आणि रिसिव्ह करण्याचा एक मार्ग आहे.

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला hello असा मेसेज करता, त्यावेळी hello सेंड होताच, हा शब्द मशिनी कोडमध्ये बदलला जातो. म्हणजेच हा शब्द मशिनी भाषेत Encrypted होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवला जातो, तिथे हा ‘डिक्रिप्ट’ होतो. त्पुयानंतर पुन्हा हा कोड hello मध्ये बदलला जातो. ज्याने मेसेज पाठवला त्या व्यक्तीपासून ते ज्याला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीपर्यंत मेसेजचा प्रवास ‘कोड’ रुपात होतो. मध्येच हा मेसेज कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास, तो डिकोड करू शकत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप वर युजर्स टेक्स्ट मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडीओ, व्हॉईस मेसेज, कागदपत्र, स्टेटस अपडेट्स, कॉल्स, व्हिडीओ कॉल्सद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं व्हॉट्सअ‍ॅपची जबाबदारी आहे. दोन लोकांमध्ये होणारं चॅट हॅक होऊ नये, ते चुकीच्या हातात जाऊ नये यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ फीचरची सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP