व्हॉट्सअॅप ग्रुप धावला सिंधुताई सपकाळ यांच्या मदतीला

shindutai sapkal

मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची गाडी मुंबई-पुणे महामार्गावर नादुरुस्त झाली. त्यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्या मदतीला ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप धावून आला. शनिवार आणि रविवारला जोडून आलेल्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान काल रात्री 12.30 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर सिंधुताई यांची गाडी नादुरुस्त झाली होती. यासंदर्भातील माहिती खोपोली येथील व्हॉट्सअप ग्रुपला मिळाली. ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य हे तातडीने सिंधुताई यांच्या गाडीचा शोध घेत होते.

याचदरम्यान खोपोलीजवळ सिंधुताई यांची गाडी नादुरुस्त झाल्याची त्यांना आढळून आली. ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी सिंधुताई यांच्यासाठी दुस-या गाडीची व्यवस्था केली.