WhatsApp देणार ‘डिजीटल पेमेंट’ ची सुविधा

blank
व्हॉटस्अ‍‍ॅपचे मॅसेंजरचे सहसंस्थापक ब्रायन अ‍ॅक्शन यांनी दिल्लीत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेत ‘डिजीटल इंडिया’ या मोहिमेत सक्रीय सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी व्हाटसअ‍ॅप लवकरच आपल्या भारतीय युजर्ससाठी ‘डिजीटल पेमेंट’ची सुविधा देणार असल्याचे जाहीर केले.
व्हॉटस्अ‍‍ॅपच्या 120 कोटींपैकी 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स हे भारतीय आहेत. यामुळे या मॅसेंजरने भारतावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यावर लवकरच व्यावसायिक पध्दतीच्या संदेशांची सेवा येणार असून या माध्यमातून भारतातून बिझनेसची मोठी संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉटस्अ‍‍ॅपनेही यासाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत ब्रायन अ‍ॅक्शन यांनी दिले आहेत.blank