नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉट्स ॲप ठप्प

व्हॉट्सॲप

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काल रात्री १२ वाजता मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ठप्प झाले. ओव्हरलोड झाल्यामुळे संदेश पाठवणे किंवा स्वीकारणे बंद झाले होते. यामुळे वापरकर्त्यांना मित्र-परिवाराला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यापासून वंचित रहावे लागले. रविवारी रात्री ज्यांनी पहिल्या २ ते ३ मिनिटांपर्यंत संदेश दिले ते पोहचले. पण, त्यानंतर मात्र हे संदेश आप्तजनांपर्यंत पोहोचले नाहीत.

त्यानंतर रात्री १ वाजेपर्यंत व्हॉट्सअॅप बंद होते. त्यानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाल्याने चाहते खूष झाले.