आता व्हॉट्सअॅपचे अफवा रोखण्यासाठी नवे फीचर

टीम महाराष्ट्र देशा :  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे .सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे व्हॉट्सअॅपला आम्ही आज एक नोटीस पाठवली आहे. व्हॉट्सअॅपवरुन पसरणाऱ्या अफवांमुळे मागील काही दिवसांत जमावाकडून होणाऱ्या अनेक निर्घुण हत्यां घडल्या आहेत. मुले पळवण्याच्या अफवेवरुन अनेक लोकांचे बळी गेले. यामुळे व्हॉट्सअॅपला आता सावध आणि जबाबदार व्हावे लागेल असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे .

व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी तातडीन काम करावं, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले. व्हॉट्सअॅप लोकांची सुरक्षा आणि संवादाची काळजी घेत असून आम्हाला असं वाटत नाही की ही सेवा घातक आहे. कोणीही या सेवेचा वापर चुकीच्या पद्धतीने करु नका. या अफवा रोखता येतील, अशी व्यवस्था कंपनी लवकरच आणेल.असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याच्या घटना आता देशभर पसरल्या आहेत. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता. व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश त्यांनी दिला.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता