‘रंगेल दरेकरांना एवढी मस्ती कशाची? महिलांची तत्काळ माफी मागा, अन्यथा..’

बीड : सोमवारी शिरुरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. यावरून नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. तर दरेकरांविरोधात राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली आहे.

बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेखा फड यांनीही दरेकरांवर जहरी टीका केली आहे. ‘भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता या नावाला कलंक असलेले, दरेकर यांनी ते किती दिड शहाणे आहेत हे शेखचिल्ली सारखे उदाहरण देवून दाखवून दिले आहे. महिलांबद्दल अर्वाच्य भाषेत टिप्पणी करणाऱ्या या ‘रंगेल’ विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा का घेवू नये?’ असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

‘प्रवीण दरेकरांना एवढी मस्ती कशाची? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजाने नाकारलेल्या, सदैव दुर्लक्षित राहिलेल्या अशा तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना राजकारणात संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. लोककलावंत किंवा गरीब मागास पुरूष कोणीही असो, सर्वांना राजकीय पक्ष प्रवेश करण्याचा व राजकारण करण्याचा हक्क आहे. आणि तो लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला आहे. पण भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता या नावाला कलंक असलेले, यांनी ते किती दिड शहाणे आहेत हे शेखचिल्ली सारखे उदाहरण देवून दाखवून दिले आहे. महिलांबद्दल अर्वाच्य भाषेत टिप्पणी करणाऱ्या या ‘रंगेल’ विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा का घेवू नये?’

‘मला वाटतं प्रवीण दरेकर स्वअनुभव सांगतायत. उचलली जीभ लावली टाळ्याला जरा तरी लाज वाटू द्या. तुमच्या फाजील वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. पण एक लक्षात ठेवा तुम्ही उधळलेल्या या बेलगाम मुक्ताफळामूळे तमाम माता-भगिनींचा अवमान झाला आहे. प्रविण दरेकर तुम्हाला जनाची नाही निदान मनाची जरी थोडी शिल्लक असेल तर ताबडतोब महिलांची जाहीर माफी मागा. नसता उद्यापासून राष्ट्रवादी महिला काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर फिरू देणारं नाही हे लक्षात ठेवा. हा धमकीवजा इशारा समजा. आणि एवढं होऊनही जर तुम्ही माफी मागितली नाहीत, तर मात्र आम्ही तुमचं ‘थोबाड’ आणि गाल नक्कीचं रंगवू शकतो’ असा इशारा रेखा फड यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या