पवार कुटुंबात काय चाललंय, काहीच कळत नाही – विनोद तावडे

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा : बारामतीत पराभवाची चिन्हं दिसल्यावर शरद पवार म्हणतात ईव्हीएममध्ये गडबड आहे, अजित पवार म्हणतात गडबड नाही, पवार कुटुंबात काय चाललंय, काहीच कळत नाही, असा घणाघाती टोला भाजप मंत्री विनोद तावडें यांनी लगावला आहे.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबद्दल विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने विरोधकांचे कान उपटले असताना विरोधकांकडून मात्र जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणत पुन्हा एकदा धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी ईव्हीएमला क्लीन चिट दिली. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र देशभरात ईव्हीएमविषयी शंका असल्याचं म्हणाल्यात. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त केली होती. यामुळे पवार कुटंबीयांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.