काय आहे नेमकी राफेल डील ?

टीम महाराष्ट्र देशा – इस्रायल, फ्रान्स, अमेरिका हे भारताचे साथीदार आहेत. भारत नेहमीच आपली क्षमता वाढण्यासाठी या देशांकडून आधुनिक हत्यार खरेदी करत असतो. अशाच प्रकारे भारताचे 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते.

काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमान भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खरेदीचा निर्णय घेतला होता.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षी फ्रान्स दौऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.

मोदींनी करार केल्यानंतरही विमानांच्या किंमतींमुळे व्यवहार अडकून होता. फ्रान्सने भारताकडून 36 विमानांच्या मोबदल्यात 65 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही किंमत कमी करण्याची मागणी केली आणि त्यात यशही मिळाले. 59 हजार कोटी रुपयांमध्ये हा सौदा पक्का झाला.