मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सध्या राज्यात एका विषयाची अधिक चर्चा सुरु आहे, ती म्हणजे एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेली आघाडीची ऑफर. यामुळे भाजप शिवसेनेला निशाण्यावर धरत आहे. आता यावरून तसेच इतर अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपला चांगलेच सुनावले आहे.
शिवसेना झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही. ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची १०० टक्के खात्री आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे. ज्यांच्याकडून धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करणं ही त्यामागची चाल आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे. यांचे नुसते जबाब घेतले तर तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.
तसेच विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला असं ते म्हणत होते. पण तसं नाही, कोर्टाने अधिकार अमान्य केला नसून किंवा शिक्षा रद्द केली नाही तर फक्त कालावधी कमी करा असं सांगितलं आहे. खोटं काम अजिबात झालेलं नाही. या छोट्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. काही झालं की लोकशाहीचा खून म्हणून आरडाओरड होते, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला निशाण्यावर धरले.
महत्वाच्या बातम्या:
- “अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा…”, उद्धव ठाकरेंचा घणाघात
- “मी ठरवलं की नंबर 1 येतोच”- देवेंद्र फडणवीसांच अप्रत्यक्ष आव्हान
- मला ‘जनाब’ म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात?; उद्धव ठाकरेंचा टोला
- काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे की काय? पहा काय आहे सत्य..
- शेतकऱ्यांचा ‘कृषी धोरण योजनेत’ सहभाग वाढवण्यासाठी महावितरण अधिकारी रस्त्यावर..
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<