तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्पोटानंतर राज्यात शिवसेना-भाजपात जोरदार शाब्दिक हल्ले सुरु झालेत. २०१४ निवडणूक निकालानंतर शिवसेनेने काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव पाठवला होता असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर शिवसेनेचा खरा उघड झाला असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.तर केवळ १२२ आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते आधी सांगा असा टोला शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

यावरुन आता शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने जे केले ते खुलेआम केले. आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव ठाकरेंनी केले नाहीत असा पलटवार शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे.

Loading...

कायंदे पुढे म्हणाल्या की, २०१४ मध्ये युती शिवसेनेने नाही तर भाजपनेच तोडली होती. २०१४ च्या लोकसभेत मोदी लाटेनंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी भाजपने युती तोडली , आपल्या नेतृत्वात एकनाथ खडसे यानी युती तुटल्याची घोषणा केली होती.असेही कायंदे पुढे म्हणाल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण