‘न्यूझीलंड संघ कोणत्या जगात राहतो?’, ‘त्या’ निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाने व्यक्त केला संताप 

nuziland

नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्धची मालिका रद्द केली आहे. हा दौरा रद्द करण्याचा निर्णय तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वीच घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मैदानावर उतरण्यास  नकार देत दौरा रद्द करण्याची घोषणा केली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे प्रमुख रमीज रजा हे न्यूझीलंडच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. त्यांनी आता  आयसीसीपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला आयसीसीसमोर येण्यास तयार राहायला सांगितले आहे.

रमीज यांनी ट्विटरवर लिहिले, ‘हा एक विचित्र दिवस आहे, मला माझ्या खेळाडू आणि चाहत्यांसाठी खूप वाईट वाटते. अशाप्रकारे, सुरक्षेच्या धोक्याबद्दल एकतर्फी चिंता व्यक्त करत मालिकेतून माघार घेणे अत्यंत निराशाजनक पाऊल आहे. न्यूझीलंड संघ कोणत्या जगात राहतो? आता न्यूझीलंड संघाने आयसीसीसमोर आमचे बोलणे ऐकायला तयार व्हावे.

न्यूझीलंड संघ 17 सप्टेंबर ते शुक्रवार ते 3 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार होता. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा दौरा कालपासून सुरू होणार होता, जो सुरक्षेच्या कारणामुळे काही तास आधी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकदिवसीय सामन्यानंतर न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेतही खेळावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या