अनियमित मालमत्ता नियमित करण्यासाठी काय कराल? ‘एमआयएम’तर्फे मोफत मार्गदर्शन; खा. जलील यांचा पुढाकार!

अनियमित मालमत्ता नियमित करण्यासाठी काय कराल? ‘एमआयएम’तर्फे मोफत मार्गदर्शन; खा. जलील यांचा पुढाकार!

imtiyaz jaleel

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील अनियमित मालमत्ता प्लॉट, घर व दुकानांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याची सुवर्णसंधी महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु अनियमित मालमत्ताधारक नागरीकांना त्यांच्या मालमत्ता नियमित करण्यासाठी कागदपत्रांचे पुरेसे ज्ञान नसल्याने नागरीक वंचित राहणार होते. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने नागरिकांना गुंठेवारी बाबत सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या विशेष प्रयत्नाने बुधवारी एमआयएम पक्षातर्फे गुंठेवारी कायद्यांतर्गत सर्वसामान्य नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दारुस्सलाम कार्यालय, बुड्डीलेन येथे नागरीकांना सहकार्य व मागदर्शन करण्यासाठी गुंठेवारी कॅम्पचे उदघाटन करण्यात आले. आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नागरीकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

गुंठेवारी कायद्यांतर्गत प्लॉट, घर किंवा दुकानाचे नियमितीकरण करण्यासाठी बॉन्ड पेपर, रजिस्ट्री, पी.आर कार्ड, सातबारा, खरेदीखत यासोबत लाईट बिल आणि मालमत्ता कराची पावती असल्यास सोबत आणावी. कागदपत्रांनुसार तात्काळ मोफत संचिका तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिकेत सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मालमत्तांचा नकाशा विनामुल्य बनवुन प्रमाणित सुध्दा करुन देण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी बिलाल जलील, जिल्हाध्यक्ष समिर साजीद बिल्डर, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

गुंठेवारी कायद्यातंर्गत मालमत्ता नियमित केल्याने होणारे फायदे

औरंगाबाद शहरातील अनियमित प्लॉट, घर व दुकानाचे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण केल्याने मालमत्तेचा व्हॅल्युएशन म्हणजे किंमती वाढणार, बँकेमार्फेत कर्जाची सुविधा उपलब्ध होणार, शासकीय योजनांचा लाभ मिळणार, घराचा कर कमी होणार विशेष म्हणजे मालमत्ता सुरक्षित होऊन महानगरपालिकेतर्फे सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणार आहेत.

हरित पट्टयात व आरक्षण असलेल्या जागेवर मागील ३० ते ४० वर्षापासून वसाहती विकसीत झाल्या असुन अशा मालमत्ताधारकांनी सुध्दा गुंठेवारी कायद्यातंर्गत मालमत्ता नियमित करण्यासाठी संचिका दाखल करावी जेणेकरुन त्यांना सुध्दा शासनस्तरावरुन मंजुरी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या