एक्झिट पोल : शरद पवारांच्या नातवाचे काय होणार ? वाचा सविस्तर

टीम महाराष्ट्र देशा : एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे. ‘न्यूज18’च्या या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. याचदरम्यान, प्रसार माध्यमांनी सर्वे नुसार एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत.

या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महाआघाडीला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असलेले शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकतो. तर त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आपला झेंडा फडकवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.