आता ‘त्या’ चार राज्याचे राज्यपाल काय निर्णय घेणार?

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :  कर्नाटकमध्ये भाजपने १०४ जागा निवडून आणत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या निकषावर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावले होते.हाच निकष लाऊन गोवा, मणिपूर, मेघालय आणि बिहारमध्ये आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधकांनी तेथील राज्यपालांकडे केली आहे दरम्यान याबाबत आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलय.

गोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि ४0 सदस्यांपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक १६ आमदार असल्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी विनंती केली. तिथे भाजपाचे १३ आमदार आहेत. बिहारमध्ये तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल सतपाल मलिक यांची भेट घेतली. तिथे राजदकडे ८0 आमदार तर सत्ताधारी जदयूकडे ७१ आमदार आहेत.मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनीही कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान आता भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.