मुंबई: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सर्व दुकानांवर आता मराठी भाषेत फलक लावायचा. या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरतून होत असले तरी या निर्णयाला विरोध देखील अनेक जणांनी दर्शवला आहे. गुणारत्न सदावर्ते यांनी देखील या निर्णयाविरोधात मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर आता अभिनेता सुमित राघवनने देखील या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
सुमित राघवनने (Sumit Raghavan) मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा महाराष्ट्रातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ रिट्वीट करत आपल्या भावना केल्या. सुमित राघवनने ट्वीटद्वारे म्हणाला, याने काही मदत होणार का? तर अजिबात नाही. मराठी भाषेला प्रोत्साहन द्यायचे असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखं आहे, असं देखील यावेळी म्हणाला.
मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिश बद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो "मराठी" आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची? https://t.co/UAYE0U2cUJ
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) January 13, 2022
पुढे दुसऱ्या ट्वीटमध्ये सुमित राघवन म्हणतो, मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं? असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचे. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून “मराठी अस्मिता” जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय. असं सुमित राघवन याने आपलं मत व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘मला जबाबदारीतून मुक्त करा’; पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफांचं वक्तव्यं
-
“दीदींच्या प्रकृतीत सुधारणा.. ; बहीण आशा भोसले यांनी दिली प्रतिक्रया
-
लोक मूर्ख नाहीत त्यांना नौटंकी समजते; मराठी पाट्या लावून तरुणांना नोकऱ्या देणार का?-खा. जलील
-
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात धाव
-
“फडणवीस हे स्जेजवरचे नट तर राणे आणि विखे-पाटील…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<