fbpx

मसूद अझरचा फैसला आज संयुक्त राष्ट्रसंघात , चीनच्या भूमिकेवर लक्ष

टीम महाराष्ट्र देशा :   पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहजला अटक करण्याचे प्रयत्न भारत सरकार करत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीची आज बैठक होत आहे या बैठकीत मसूद अजहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायचं की नाही याचा फैसला होणार आहे. मसूद अजहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी मागणी भारत सरकार वारंवार करत आहे. आधीच्या बैठकीत चीनने भारताच्या या प्रस्थावाला विरोध दर्शवित अजून पुरावे मागितले होते. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत चीन काय भूमिकेवर सगळ्याचं लक्ष लागणार आहे.
टीम महाराष्ट्र देशामसूद अझरचा फैसला आज संयुक्त राष्ट्रसंघात , चीनच्या भूमिकेवर लक्ष

मसूद अजहरमुळे भारतीय उपखंडातील शांततेला धोका असल्याचं मत भारताने सुरक्षा परिषदेकडे व्यक्त केले होते त्याने भारतात अनेक अतेरिकी हल्ले घडवून आणले आहेत त्यात संसदेवरील हल्ला, पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ला, उरी हल्ला व काश्मीरमधील वेगवेगळ्या हल्ल्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला आंतराष्ट्रीय दहशतवादी करण्यासाठी अमेरिकेनेही भारताला पाठींबा दिला आहे तसेच फ्रान्स आणि ब्रिटनचीही यासाठी संमती आहे.

यापूर्वीही खूप वेळा सुरक्षा परिषदेत याविषयी प्रस्ताव मांडण्यात आला होता परंतु चीनने आपल्या मताचा वापर करून हा प्रस्ताव मंजूर होवू दिला नव्हता. त्यामुळे चीन यावेळी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे