शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाची नासाडी करून काय साध्य होणार? – खा. राजू शेट्टी

Raju Shetty news

टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेला शेतीमाल, दूध, भाजीपाला यांची अडवणूक करून, त्याची नासाडी करून काय साध्य होणार?  असा थेट सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या आंदोलनात अग्रस्थानी असलेल्या सुकाणू समितीनेही आम्ही या संपात सहभागी नसल्याचे जाहीर केले आहे. शेट्टी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जुन्या शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांनी  सहभाग तर दूर, पण या संपालाच विरोध सुरु केल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यात १ जूनपासून शेतकरी संप सुरू झाला.  तरी काही ठिकाणची तुरळक आंदोलने वगळली, तर संपाची तीव्रता जाणवलेली नाही.  या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी  संपावरच टीका केली असून तो ‘शेतकरीविरोधी’ असल्याचे म्हटले आहे.संपासारखे आंदोलन संपूर्णत: चुकीचे आहे.  यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होते. यामुळे या अशा आंदोलनापासून आम्ही दूर आहोत. यापेक्षा सरकारकडून सरसकट कर्जमाफी मिळते का, हे पाहणे अधिक गरजेचे होते. शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेला शेतीमाल, दूध, भाजीपाला यांची अडवणूक करून, त्याची नासाडी करून काय साध्य होणार? असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.