‘महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार?’, सदाभाऊंचा सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झाले. त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

आमदार नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त होतोय. तर राजकीय क्षेत्रामधूनही त्यांच्यावर टीकेटी झोड उठवण्यात येत आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार असा सवाल सदाभाऊंनी विचारला आहे.

महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’ पणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‘राजू नवघरे’ यांच्या या कृत्यानंतर मग आता बाबर सेना काय करणार. राष्ट्रवादीच्या आमदाराला चपलेने मारणार की भवन वर बोलून फुलाचा हार घालणार? असा प्रश्न विचारत या घटनेचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या