fbpx

असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत

टीम महाराष्ट्र देशा :  ‘मी, पण उत्तर शोधतो आहे, मी असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं’, असा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘जयंत पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. नाथाभाऊ गप्प का? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही. सरकार आणि पक्षाकडून मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहे’, अशी व्यथाच त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाथाभाऊ गप्प का ? असा सवाल केला होता , तर मुक्ताईनगर येथे होणारी सभा देखील राष्ट्रवादी काँग्रेसने रद्द केली होती.

1 Comment

Click here to post a comment