Share

Tulshi Vivah 2022 | तुलसी विवाहासाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक?, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी (Diwali) संपताच देशामध्ये सर्वत्र तुलसी विवाह (Tulshi Vivah) ची चाहूल लागते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पासून तुलसी विवाहला सुरुवात होते. या दिवशी चातुर्मास संपून तुलसी विवाहाच्या शुभ कार्याला सुरुवात होते. हिंदू धर्मात तुलसी विवाह विशेष महत्त्व आहे. यावर्षी पाच नोव्हेंबर 2022 पासून तुलसी विवाहाच्या मुहूर्त सुरुवात होत आहे.

असे मानले जाते की, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या शालिग्राम जिचा विवाह माता तुळशीची विधीवत विवाह करतात. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. तुलसी विवाह दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचा वापर केला जातो. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्याच साहित्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

तुलसी विवाह (Tulshi Vivah) साठी लागणारी सामग्री

तुलसी विवाहासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. त्यांची यादी पुढीलप्रमाणे: भगवान शालिग्राम, तुळशीचे रोप, ऊस, मुळा, कलश, नारळ, कापूर, आवळा, हंगामी, फळं,  कोथिंबीर, गंगाजल, पेरू, दिवा, धूप, फुलं, चंदन, माळ, सिंदूर, लाल ओढणी, हळद कुंकू, कपडे,नववधू साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी : मेहंदी, बांगड्या,साडी, टिकली इत्यादी

तुलसी विवाह दरम्यान या मंत्राचा जप करावा

तुलसी विवाह दरम्यान, देवाची आराधना करण्यासाठी ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा.

तुलसी विवाहाचे महत्व

वैवाहिक जीवनात अधिक गोडवा वाढवण्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तुळशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, जर एखाद्याच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा लग्नामध्ये गोडवा नसेल तर तुलसी विवाहाच्या दिवशी तुम्ही मनोभावे देवाची आराधना केल्यास तुमच्या आयुष्यातील या समस्या दूर होतील.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी (Diwali) संपताच देशामध्ये सर्वत्र तुलसी विवाह (Tulshi Vivah) ची चाहूल लागते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now