सुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केलं?

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात उतरत प्रकाश आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदेंना आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे विरुद्ध आंबेडकर असा संघर्ष आता रंगू लागला आहे. सुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केलं, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.

‘राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय निवडणुकीचा पुरस्कार केला होता. इंदिरा गांधींना विचारुन हे विधान केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मग घटना बदलण्याचा प्रयत्न कोणी केला?’ असा रोकठोक सवाल देखील शिंदेना विचारला आहे.

प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. तिकडे भाजपने देखील स्वामींच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने शिंदेंचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.