औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या

औरंगाबाद : गेल्या १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

हे राहणार बंद
-औरंगाबाद शहरात ११ मार्चपासून सर्व सामाजिक, राजकीय धार्मिक कार्यक्रम, आंदोलन, सभा, मोर्चे
-लॉन्स मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यांना बंदी
-आठवडी बाजार बंद राहतील, जाधववाडी भाजीमंडी पहिल्या सात दिवसांसाठी पूर्ण बंद
-मॉल बंद राहणार, दुकाने सुरू राहणार, चिकन मटण दुकाने सुरू राहतील
-शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस बंद ठेवणार, ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार
-हॉटेल, बार, खाद्य दुकाने रात्री ९ वाजेपर्यत सुरु राहतील, ५० टक्के ग्राहक क्षमतेसह
-होम डिलीव्हरी रात्री ११ वाजेपर्यत सुरु ठेवता येणार
-स्वीमिंग पुल, क्रीडा स्पर्धा बंद, खेळाडूंना सराव सुरू ठेवण्याची मुभा

हे राहणार सुरू
-वैद्यकीय सेवा, वृतपत्र, भाजीपाला विक्री, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, सर्व वाहतूक, बँक, कारखाने सुरू राहणार
-दुकाने सुरू राहणार, चिकन मटण दुकाने सुरू राहतील

राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही. दरम्यान, खासगी व कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र सर्वांनी सोबत बाळगावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या