मतांसाठी जनतेचा खोटा पुळका आलेल्यांनी १५ वर्षात काय केले – शिवेंद्रसिंहराजे भोसले

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाव न घेता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना लगावले जोरदार टोले

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना जोरदार टोले लगावले आहेत. काल छत्रपती उदयनराजेंनी नवा न घेता शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ४० वर्षे आमच्याकडे सत्ता होती. सत्ता सातारकरांनी, जनतेनं आम्हाला दिली आणि तुम्हाला का घरी बसवले होते? याचेही आत्मपरीक्षण करा.

मतांसाठी जनतेचा खोटा पुळका आलेल्यांनी १५ वर्षात काय केले हे एकदा जाहिर करावे. अशी कणखर टीका शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेल्या पत्रकात केली आहे. एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के मारुन त्यांना देशोधडीला लावणे यासारखी विकासकामे आमच्या हातून झाली नाहीत आणि होणारही नाहीत’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कामावर सुद्धा ताशेरे ओढल ज्या भागाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्या भागात आपण काय दिवे लावले? याचीही कबुली आपण दिली पाहिजे. थापेबाजी करुन विकासकामे होत नसतात. टीका करायला फारशी अक्किल लागत नाही, बोंबलायला फारशी अक्कनल लागत नाही, त्याचप्रमाणे थापा मारायलाही फारशी अक्कल लागत नाही, हे साताऱ्यातीलच काही लोकप्रतिनिधींमुळे खरे ठरले आहे. अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे भोसले यानी हल्लाबोल चढवला.

शिवेंद्रसिंहराजें पुढे म्हणाले, चुना, तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारु या कोणाच्या आवडीच्या गोष्टी आहेत, हे सातारकरच नाही तर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे चुना लावून बोंब कोण मारतो, हेही सगळ्यांना कळून चुकले आहे. निवडून आल्यानंतर गेल्या १०-१५ वर्षात किती विकासकामे मंजूर केली आणि किती पुर्णत्वास नेली हा संशोधनाचा भाग आहे.