सिंहासन चित्रपटातून आम्हाला मुख्यमंत्र्यांची प्रतिमा दिसली – शरद पवार

blank

पुणे : सिंहासन चित्रपटासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची केबिन चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आमची काहीशी टिंगल करण्यात आली होती, मात्र त्या टिंगळीतून काही चांगलं दिल जाणार असेल तर त्याचाही आम्ही आनंद घेतो आशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू आणि जब्बार पटेल यांच्या चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या.

अरुण साधू यांच्या स्मृत्यर्थ विज्ञानापासून सामाजिक विषयापर्यंत संशोधन करणाऱ्या विद्यार्थी, पत्रकारांना आर्थिक पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या घोषणेसाठी ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.