मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय. मात्र बांधावरच्या शेतकऱ्यांना काय वाटत ?

farmer

महाराष्ट्र देशा स्पेशल रिपोर्ट –

शेतकरी संप ही स्वप्नवत वाटणारी  संकल्पना अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे येथून सत्यात उतरली. कर्जमाफी,स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी सुरु झालेल्या या क्रांतीची ठिणगी संपूर्ण राज्यात भडकली आणि अखेर शनिवारी २४ जूनला ३४ हजार कोटीं रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे

Loading...

कर्जमाफीचा राज्यातील तब्ब्ल ८९ लाख शेतकऱ्यांना फायदा  होणार आहे . तर ४० लाख शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा होणार आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार हि कर्जमाफी म्हणजे ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र अजूनही काही प्रश्न कायम राहतात. ते म्हणजे 

1. कर्जमाफीमुळे राज्यातील शेतकरी खुश आहे का ?
2. कर्जमाफी हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता का ?
3. कर्जमाफीला ऐतिहासिक म्हणण्याची आपण घाई करत आहोत का ?

4. स्वामिनाथन आयोग आणि हमी भावाचं काय होणार ? 

या सगळ्या प्रश्नावर काय म्हणतोय महाराष्ट्रातील शेतकरी पहा महाराष्ट्र देशा थेट शेतीच्या बांधावरून

हे आहेत बाभुळखेडा गावाचे कुशीनाथ विधाटे आपली सगळी हयात यांनी शेती मध्ये घातली ते सरकारच्या या निर्णयावर खुश आहेत खरे पण जरा उशीरच झाल्याचं आजोबा म्हणत आहेत ….

[jwplayer LNgN9rpj]

भागवत दाभाडे हा तरुण या निर्णयाचे समर्थन करत आहे पण स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी आणि हमी भावाचा निर्णय न झाल्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे  शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याची चीड सुद्धा व्यक्त करतोय .

[jwplayer Vf3jGJBM]

राज्यातील तरुण शेतकरी मात्र मुख्यमंत्र्यावर कमालीचे नाराज दिसत आहे.  रवी उगलमुगले हे तर कर्जमाफी हा केवळ फार्स असल्याचं सांगत आलेत . जसा या घोषणेला काळ उलटेल  तशी शेतकऱ्याची दिशाभूल कशी  झाली हे समोर येईल असं रवी उगलमुगले यांना वाटत आहे . 

[jwplayer PgXqBee4]

ज्या तरुण शेतकऱ्याने आणि शेतकऱ्यांच्या पोरांने हा संप यशस्वी केला अशा तरुण शेतकऱ्यांना तर हि  कर्जमाफीच मान्य नाही . हा तरुण आहे ज्या अहमदनगर जिल्ह्यातून या आंदोलनाची ठिणगी पडली त्याच जिल्ह्यातील देडगाव येथील , जिथं शेतकऱ्याला  शाश्वत उपाय नाही तिथं ही कर्जमाफी काय कामाची ? पहा मुख्यमंत्री साहेबाना काय दिलाय या तरुण  शेतकऱ्याने संदेश … 

[jwplayer l5ogH5SU]

” शासनाने दिलेली ही कर्जमाफी चुकीची असून यामुळे सरकारच्या तिजोरीवर भर पडणार आहे .  विकासकामे थांबतील , महागाई वाढेल आणि यांचा भर पुन्हा सर्वसामान्य शेतकऱ्यावर पडेल , त्यामुळे सरकार ने कर्जमाफी करण्यापेक्षा शेतमालाला हमीभाव , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी शिफारसी लागू कराव्या. शेतीपंपास मोफत आणि २४ तास वीजपुरठा करावा “

दत्तात्रय गागरे ,  शेतकरी ( देवळाली प्रवरा )\

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार