पुणे : देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. तर सत्ताधारी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवत आहेत. यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे.
ADVERTISEMENT
पाच राज्यांच्या निवडणूका चालू असताना इंधनवाढ झाली नाही. परंतु निवडणुका पार पडताच असा कोणता भूकंप आला आहे कि तुम्ही रोज इंधन दरवाढ करताय, सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.