Share

Chandrakant Khaire | “भुमरेंचं योगदान काय?”; चंद्रकांत खैरे यांचा खोचक सवाल 

मुंबई : पुढील काही दिवस एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण शिवसेना पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार, याचा निकाल होणार आहे. यावरून राज्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. निकाल लागयच्या आधीच दोन्ही गटांकडून चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा केला जात आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते चंद्राकांत खैरे यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत संदीपान भुमरे यांचा समाचार घेतला आहे.

भुमरेंचं योगदान काय’?

चंद्रकांत खैरे  यांनी यावेळी आमदार संदीपान भुमरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. “1985 पासून मी शिवसेनेसोबत आहे. आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी आंदोलने केली, जेलमध्ये गेलो, वेळप्रसंगी पोलिसांचा मारही खाल्ला. मात्र या सर्वांमध्ये संदीपान भुमरेंचं योगदान काय?” असा खोचक सवाल खैरेंनी केला आहे. आम्ही शिवसेना वाढवली म्हणून भुमरेंसारखे आज निवडून येत असल्याचा टोला खैरेंनी लगावला आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 1966 मध्ये स्थापना झाली. त्यानंतर 1968 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावरच शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. मात्र आता काही जण पैशाच्या जोरदार शिवसेनेमध्ये फूट पाडायला निघाले आहेत. मात्र मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो की हा अघोरीपणा चांगला नसल्याचं खैरें यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असून एकनाथ शिंदे पक्षाध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानपदाचीही स्वप्नं ते पाहतील. मग देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी काय करणार?, असा खोचक सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी चंद्रकांत खैरे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे आधी नगरसेवक झाले, नंतर सभागृहनेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना-भाजपा युतीमध्ये त्यांना चांगली खातीही दिली. त्यांना नगरविकास खातंही दिलं. मुख्यमंत्र्यांकडचं खातं त्यांना देण्यात आलं. एवढं झाल्यानंतरही त्यांची अपेक्षा खूपच आहे आणि त्यासाठी त्यांना फोडाफोडी करायची आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : पुढील काही दिवस एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण शिवसेना पक्षाचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics