सोशल मिडीयावर ट्रेंडीग ‘सोवळ’ म्हणजे नेमक काय ?

what is soval

गेली दोन दिवस झाले सोशल मिडिया असो कि न्यूज चॅनल ‘सोवळ’ हा शब्द पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भलताच गाजत आहे. ब्राह्मण महिला असल्याचा बनाव करून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आणि तेव्हा पासूनच हा ट्रेंड सुरु झाला.

सोशल मिडीयावर देखील ‘ #सोवळ’ हा हॅश टॅग खूप चालत आहे. ज्या सोवळ्या वरून हा वाद उभा राहिला आहे.ते सोवळ म्हणजे नेमक काय ? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

सोवळ या शब्दाचा अर्थ स्वच्छता, पावित्र असा होतो. कोणत्याही मंदिरात किवां एखाद्या सण उत्सवात देवाला नैवद्य दाखवला जातो. तो नैवद्य बनविताना स्वच्छता राखली जावी या करता नवीन किवां स्वच्छ कपडे घातले जातात यालाच ‘सोवळ’ अस म्हणल जात.

अंघोळ केल्यानंतर सोवळ परिधान करतात. सहसा हे घातल्यानंतर कोणालाही स्पर्श केला जात नाही. याचा एकच उद्देश असतो तो म्हणजे बाहेरील कोणत्याही गोष्टीचा देवाच्या नैवेद्याला स्पर्श होवू नये.

सोवळ हे कोणत्याही एका विशिष्ठ जाती किवां धर्मासाठी निगडीत नाही. हिंदू परंपरेनुसार कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्यासाठी सोवळ नेसल जात. त्याचप्रमाणे काही लोक आपल्या रूढी परंपरेनुसार ज्या पद्धतीने नियमअटी पाळत धार्मिक विधी करतात त्यालाही सोवळ अस म्हणल जात.

या सर्व गोष्टीजरी असल्या तरी कालानुरूप जाचक रूढी परंपराच त्याग करण हे माणुसकीच दर्शन घडवणाऱ्या असतात. त्यामुळे माणुसकीला घातक असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा ‘महाराष्ट्र देशा’ समर्थन करत नाही.