मुंबई : पराग अग्रवाल (Paraga Agrawa) यांची ट्विटरचे (Twitter) सीईओ म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर सर्वत्र पराग अग्रवाल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) आणि पराग अग्रवाल यांच्यात नेमकं कोणत नातं आहे. त्यांच्या काही जुन्या पोस्टवरुन त्या दोघांमधील खास नातं असल्याची बातमी व्हायरल होत असून याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र आहेत. पराग हा खाण्याचा आणि फिरण्याचा फार शौकीन आहे, असे श्रेयाचे म्हणणं आहे. यानिमित्ताने श्रेया घोषाल हिचे ११ वर्षांपूर्वीचे एक ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. यात श्रेयाने तिची लहानपणाची मैत्री आणि पराग अग्रवालबद्दल सांगितले आहे. ‘आणखी एक बालपणीचा मित्र पराग अग्रवाल सापडला. खाद्यप्रेमी आणि प्रवासाची आवड असणारा. स्टॅनफोर्डचा हुशार विद्यार्थी. काल त्यांचा वाढदिवस होता, कृपया त्यांना शुभेच्छा द्या,’ असे ट्वीट श्रेयाने केले होते.
Congrats @paraga So proud of you!! Big day for us, celebrating this news♥️♥️♥️ https://t.co/PxRBGQ29q4
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) November 29, 2021
पराग अग्रवाल यांची ट्वीटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानतंर श्रेयाचे हे ट्वीट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पराग आणि श्रेया यांची मैत्री इतकी घट्ट आहे की, श्रेयाच्या लग्नसभारंभातही पराग सहभागी झाला होता. याचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर पराग आणि श्रेयाचे अनेक फोटो, ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच पराग अग्रवालने ट्विटरचे नवे सीईओ झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर श्रेया घोषालने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अभिनंदन पराग, आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो. हा आमच्यासाठी फार मोठा दिवस असून तो आम्ही साजरा करत आहोत,’ अशा शब्दात श्रेयाने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Deep gratitude for @jack and our entire team, and so much excitement for the future. Here’s the note I sent to the company. Thank you all for your trust and support 💙 https://t.co/eNatG1dqH6 pic.twitter.com/liJmTbpYs1
— Parag Agrawal (@paraga) November 29, 2021
तसेच ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केलं. पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत. आता मात्र सोशल मीडियावर या दोघांची मोठी चर्चा सुरू आहे.
श्रेया घोषालचे काही फोटो पहा.
महत्त्वाच्या बातम्या:
- उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला- किरीट सोमय्या
- शाळा सुरु करण्याचा निर्णय होल्डवर; महापौरांनी दिली माहिती
- ‘हजारो लोक रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही, पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या’
- २ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल