fbpx

लिंगायतांना आरक्षणाची गरज काय – शिवराज पाटील चाकूरकर

shivraj patil chakurkar governor

लातूर : लिंगायतांना आरक्षणाची काय गरज आहे असा प्रश्न दस्तुरखुद्द शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला आहे. जातीच्या निकषांवर कसले आरक्षण मागता? महिलांसाठी आरक्षण मागा असा सल्लाही त्यांनी दिला. आज चाकुरकरांनी मराठा क्रांती भवनाला भेट दिली. या भवनात चालू असलेले मंगेश निपाणीकर यांचे रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी ते आले होते.

आरक्षण आर्थिक निकषांवरच मिळाले पाहिजे, घटनेनेही तो अधिकार दिला आहे. असे चाकूरकर म्हणाले. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर ते उपस्थितांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. जातींच्या आधारावर आरक्षण मागितल्यानंतर इतर जातीही एकमेकांशी आरक्षणासाठी स्पर्धा करु लागतात. आता आरक्षण आर्थिक निकषांवर देण्याची वेळ आली आहे. या देशात अर्ध्या स्त्रिया आहेत. त्यांच्यासाठी आरक्षण का मागत नाही? विधानसभा आणि संसदेत महिलांन आरक्षण द्या अशी मागणी करण्याची हिंमत का करीत नाही? आपली आई, बहीण यांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न का करीत नाही अशी विचारणा करीत हा सगळा स्वार्थ सुरु आहे असं ते खेदाने म्हणाले.

या देशात आमदार आणि खासदारांची संख्या वाढली पाहिजे जेणेकरुन महिलांना संधी मिळेल असेही ते म्हणाले.