पुणे : देशातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालं नसलं तरी कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने मात्र गती घेतल्याचे दिसून येत असतानाच पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध आहे, पण ती टोचणार कशी ? असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे. लसीचा डोस देण्यासाठी आवश्यक सिरींजचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे कालपासून पहायला मिळत आहे.
कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसने आज चांगलीच आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोरोना लसी उपलब्ध होऊन केवळ सिरींज अभावी लसीकरण रखडणं ही पालिकेचा भोंगळ कारभार दाखवणारी घटना आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ? पुणे अ दर्जाची महापालिका, जिचं बजेट 8 हजार कोटी आहे,भौगोलिकदृष्ट्या महापालिका मोठी आहे, आज तिच्याकडे सिरींज नसावी. त्या अभावी लसीकरण बंद पडणं निश्चित पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या महापौर, चेअरमन, आणि सभागृह नेत्यांना याची कल्पना नव्हती का ? असा संतप्त सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- छोटया पडद्यावरील ‘या’ कार्यक्रमात पोहंचले रामदेव बाबा; शिल्पाला ही आवडला त्यांचा परफॉर्मन्स
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<