GST- वस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ….?

GST

देशात १ जूलै २०१७ पासुन नविन कर प्रणाली वस्तू व सेवा कर (GST) लागू होणार आहे.यामुळे संपुर्ण देशात एकच कर व्यवस्था अस्तित्वात येणार आहे.वस्तू व सेवा कर ही अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे.
वस्तू म्हणजे आपण विकत घेवू शकतो.जसे मोबाईल,संगणक ,वाहने इ. घेताना आपल्याला कर लावून खरेदी करावी लागतात.त्या वस्तूंचे ठिकाणानूसार वेगवेगळ्या किमती असु शकतात. तसेच सेवा म्हणजे ज्या आपण घेवू शकत नाही पण त्यांचा उपभोग घेऊ शकतो. जसे उपाहारगृह ,हॉटेल्स,मॉल,चित्रपटगृह ई होय.

भारतीय संविधानाच्या १२२ व्या घटना दूरुस्तीद्वारे वस्तू व सेवा कर प्रणाली भारताने स्विकारली आहे.या प्रणाली नुसार एकच वस्तू व सेवांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कर भरावे लागणार नाही.फक्त मद्य यांतून वगळले आहे.तसेच रॉकेल,पेट्रोल ,डिझेल व गॉस यांचे कर जैसे थे राहणार.

सध्या सरकारचे अस्तित्वात असलेले एक्ससाईज डुटी, व्यवसायिक कर,विक्री कर ,vat, मनोरंजन कर, प्रवेश कर,खरेदी कर,लक्झरी कर,जाहिराती कर तसेच सेवा कर हे कायमचे निघून जाऊन फक्त वस्तू व सेवा कर हा एकच प्रकारचा कर सर्व वस्तू व सेवासांठी लागणार आहे.

 

सामान्य जनतेचा फायदे :

सर्व वस्तूंचे दर समान असणार, खरेदी साठी दूसर्या ठिकाणी जावयाची अवश्यकता नाही पडणार.यामुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल.

सध्या आपण खरेदी करत असल्या वस्तूवंर ३० ते ३५ टक्के कर लागतो.तो जाऊन २०-२५ टक्क्यांपर्यतच लागणार.यामुळे महागाई काही प्रमाणात कमी होऊ शकते.

 

व्यवसायिक व उद्योगांना फाय :

विविध किचकट कर भरणा पद्धतीपासुन सुटका.

सामान एका ठिकाणाहून दूसर्या ठिकाणी पाठवणे सोपे .जकात , vat  दरवेळी भरण्याची गरज नाही.

एका राज्यात उत्पादित माल दूसर्या राज्यात कोणताही कर न लागता विक्री करता येईल.

कर चुकवेगिरीला आळा

सकल उत्पाद वाढण्यासाठी मदत होणार.

अतिरिक्त कर भरावा लागणार नाही.

 

कराचे स्लब :

-०%
-५%
-१२%
-१८%
-२८%
-सोने व मौल्यवान वस्तूवर ०.२५ % अधिक

 

हे महाग होणार ः

चाय,,कॉफि,डब्बाबंद पदार्थ ,जेम्स व ज्वेलरी,रेडिमेड कपडे,मोबाईल ,फोन बिल,क्रेडिट कार्ड बिल,चैनीच्या वस्तू,तंबाखु ,सिगारेट ,आरोग्य व वाहन विमा,अल्युमिनीयम इ.

 

स्वस्त होणार

छोटी कार,मिनी एसयूवी,घर खरेदी, बिल,पंखे,ओवन ,फ्रिज ,वाशिंग मशीन,एसी,सौर उर्जा सामान,लेदर वस्तू इ.

 

कोणत्या वस्तू व सेवावर किती कर लावायचा हा पूर्ण सरकारच्या मर्जीतला विषय आहे.

                                 लेखक
                     डॉ. सुनिलसिंग राजपुत
                              औरंगाबाद
( लेखकाच्या मताशी “महाराष्ट्र देशा ” सहमत असेलच असे नाही )
      तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा  संपर्क