fbpx

गटारी अमवस्या म्हणजे काय रे भाऊ !

आजकाल आपल्याकडे कोणता दिवस काय म्हणून साजरा केला जाईल ह्याचा भरोसा नाही. गेली दोन तीन दिवस झाले फेसबुक , वाट्सअॅपवर गटारी अमावस्येच्या शुभेच्छाचे मेसेज फिरत आहेत. पण नेमक हि गटारी अमावस्या आहे म्हणजे नेमक आहे तरी हे आपण पाहू

हे तुम्हाला माहित नसेल 

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या . या अमावास्येला ‘दिव्याची अमावस्या’ असेही  म्हणतात.  या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.

हे तुम्हाला नक्कीच माहित असणार ‘गटारी अमावस्या

दिव्याच्या अमावास्येला आपलं वेगळच महत्व आहे. मात्र आज आपल्यापैकी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोक मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन करत नाहीत . त्यामुळे श्रावण सुरु होण्याआधी एक दिवस मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.

पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण ‘पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे’. त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.

आता ही अमावस्या आपल्या कशी साजिरी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. या दिवशी दिव्याचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करून कि खाऊन- पिऊन गटारीत लोळून.