fbpx

पोल्स तसेच सर्वे करणाऱ्या मंडळींची जात कोणती ? शरद यादवांचा अजब सवाल

टीम महाराष्ट्र देशा- १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येत आहेत.

दरम्यान, विरोधकांकडून मात्र या एक्झिट पोल्सवर सडकून टीका केली जात आहे. शरद यादव यांनी या संदर्भात एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक्झिट पोल्स हे एक सत्य नसून घोटाळा असल्याचे म्हटले आहे. मात्र पुढे जे त्यांनी म्हटले आहे त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. यादव यांनी हे पोल्स तसेच सर्वे करणाऱ्या मंडळीं जात कोणती ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच एक्झिट पोल्स हे लोकशाही विरोधी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्वीट करत एक्झिट पोल चुकीचे असल्याचं म्हटले आहे. थरूर यांनी ‘माझ्या मते एक्झिट पोल हे चुकीचे आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले होते’ भारताचं म्हणाल तर, इथे जनता मोठ्या प्रमाणावर सत्य सांगण्यापासून दूर राहते म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. एक्झिट पोलचे सर्व अंदाज धुडकावून लावत थरुर यांनी आपण निवडणुकांच्या अंतिम आणि तितक्याच खऱ्या निकालांची वाट पाहू, असं ट्वीट केले आहे.