राफेल घोटाळा झालाच नाही तर चौकशीला सामोरे जा- शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा : गेली चार वर्ष सत्तेत सोबत असणाऱ्या शिवसेनेने कायम सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. अनेक सरकारी निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे करून अनेकवेळा सरकारला अडचणीत आणले आहे. आता पुन्हा राफेल करारावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मोदी सरकारला लक्ष केले आहे. जर राफेल घोटाळा झालाच नसेल तर चौकशीला सामोरे जायला काय हरकत असा प्रश्न उपस्थित करत खा.सावंतांनी खडे बोल सरकारला सुनावले आहेत.

राफेल करारावरून बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “या प्रकरणात सरकारी कंपनीला डावलण्यात आलं. ज्या कंपनीला कामाचा काहीही अनुभव नाही त्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. अरुण जेटलींचं भाषण मी ऐकलं, परंतू त्याने समाधान झालं नाही. लोकांच्या मनात संशय कायम आहे. तो संशय दूर झाला पाहिजे.”राफेलच्या मुद्द्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगलेच घमासान बघायला मिळाले.तर यावेळी शिवसेना मात्र विरोधकांच्या बाजूने उभे राहत भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

You might also like
Comments
Loading...